लातूर जिल्ह्यातील तरुणाने फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करत असल्याचे सांगत स्वतःच्या छातीत सुरा खुपसून स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ झाडाखाली बसून फेसबुक लाईव्हवर “मी आत्महत्या करत आहे” असे सांगून स्वतःच्या छातीत सुरा खुपसला. त्याचा शोध घेत असताना तो पेट्रोल पंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यावर त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.