Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8 व्या वेतन आयोगाची भुवनेश्वरमध्ये बैठक; निर्णय काय होणार?
ताज्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8 व्या वेतन आयोगाची भुवनेश्वरमध्ये बैठक; निर्णय काय होणार?

8th Pay Commission

8th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड घडत आहे. 8 व्या वेतन आयोगाच्या सल्लामसलत प्रक्रियेअंतर्गत आज (6 जुलै) ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे दोन दिवसांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत विविध कर्मचारी संघटना, पेन्शनधारक संघ आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना व मागण्या जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर आयोग 9 आणि 10 जुलै रोजी कोलकाता येथे पुढील बैठक घेणार आहे.

या बैठकीत आयोगाचे सदस्य सचिव पंकज जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. देशभरातून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांच्या आधारे आयोग आपला अंतिम अहवाल तयार करणार असून, त्याचा परिणाम सुमारे 55 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांवर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: MPSC ते NEET… विद्यार्थ्यांचा एल्गार; रोहित पवारांसह हजारो विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

चर्चेच्या केंद्रस्थानी कोणते मुद्दे?

भुवनेश्वरमधील बैठकीत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या आर्थिक हिताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. त्यामध्ये—

किमान मूलभूत वेतनात वाढ
फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा
महागाई भत्त्याची (DA) नवीन रचना
निवृत्तीवेतन आणि फॅमिली पेन्शनमधील बदल
विविध भत्ते आणि सेवा अटी

या सर्व मुद्द्यांवर कर्मचारी संघटनांचे मत जाणून घेतले जाणार आहे.

कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्या

केंद्रीय कर्मचारी संघटनांनी आयोगासमोर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत.

फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 2.86 किंवा 3.83 पर्यंत वाढवावा.
किमान मूलभूत वेतन 18 हजार रुपयांवरून 41 हजार किंवा 69 हजार रुपये करावे.
निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या 67 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळावी.
फॅमिली पेन्शन शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के निश्चित करावी.
जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

पुढे काय?

आयोगाने यापूर्वी श्रीनगर आणि लखनौ येथेही अशाच प्रकारच्या बैठका घेतल्या आहेत. विविध शहरांमधून मिळणाऱ्या सूचना आणि शिफारशींचा अभ्यास करून आयोग अंतिम अहवाल तयार करणार आहे. मात्र, आतापर्यंत आयोगाने पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर किंवा इतर आर्थिक लाभांबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा संकेत दिलेला नाही.

त्यामुळे भुवनेश्वर आणि त्यानंतर कोलकाता येथे होणाऱ्या बैठका केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आयोगाच्या अंतिम शिफारशींनंतरच वेतनवाढ आणि इतर लाभांबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts