मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यवत (दौंड) येथे तणाव निर्माण झाल्यानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आहे. एका बाहेरच्या व्यक्तीने चुकीचे स्टेटस आणि धार्मिक भावना भडकवणाऱ्या पोस्ट केल्यामुळे तणावाची सुरुवात झाली. काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, दोन्ही समाजातील लोकांनी बसून संवाद साधला असून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाणीवपूर्वक तणाव वाढवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. व्हायरल व्हिडिओ स्थानिक आहेत की बाहेरचे, हे तपासले जात आहे.