SP internal conflict Mumbai : सध्या राज्यातील २९ महापालिकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेत. अशा परिस्थितीत मुंबईत समाजवादी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भिंवडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबु आझमींची थेट सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पक्षातील दोन आमदारांमध्ये सुरू झालेल्या वादामुळे निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अबु आझमी यांनी पक्षातील निष्ठावंतांना डावलून आयातांना उमेदवारी दिल्याची तक्रार करण्यात आलीय.
हेही वाचा – ठाकरेंकडून शिंदेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेत मेगा पक्षप्रवेश
आमदार रईस शेख यांनी राज्यात पक्षामध्ये सुरू असलेल्या गोंधळाबाबत अखिलेश यादव यांनी पत्र पाठवलं आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबु आझमी यांनी राज्यात पक्षाला स्वतःची जहागीर बनवली आहे. महापालिका निवडणुकीत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना नाईलाजाने दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यावी लागत आहेत. या मनमानी कारभारामुळे पक्षात अविश्वास, अंतर्गत संघर्ष आणि धुसफूस सुरू आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील राजकारणावर त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी रईस शेख यांनी पत्राद्वारे केलीय.
अबु आझमी यांचा एककलमी आणि मनमानी कारभार
आमदार रईस शेख यांनी या पत्रात पुढे म्हटले की, अबु आझमी यांनी भिवंडीमध्ये माझ्यासोबत असलेल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून उमेदवारी नाकारली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी 2019 आणि 2024 मध्ये पक्षाला भिवंडीमध्ये विजयी करण्यात भूमिका बजावली त्यांना या निवडणुकीत बाजूला करण्यात आले. अबु आझमी यांनी एककलमी आणि मनमानी पद्धतीने उमेदवारी दिल्या आहेत.
पार्टीमध्ये नेत्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न चालू
मुंबईत माझ्याविरोधात पार्टीमध्ये अपप्रचार केला जात आहे. आयात उमेदवारांना पायघड्या घालण्यात येत आहेत. मी म्हणजे पार्टी… अशी प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांची वर्तणूक आहे. एनसीपी आणि शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य उमेदवारांची मुंबईत यावेळी निर्णयक भूमिका असताना समाजवादी पार्टीमध्ये नेत्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न चालू आहेत. या सर्वांचा फटका यावेळी पार्टीला बसू शकतो, असंही रईस शेख यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
अबु आझमी यांच्या मुलाचा पराभव
रईस शेख यांनी पत्रात पुढे म्हटले की, ‘2010 मध्ये भिवंडी पूर्व विधानसभेला अबु आझमी यांच्या मुलगा फरहान आझमी याचा पराभव झाला होता. 2019 मध्ये मला भिवंडी पूर्वमध्ये उमेदवारी दिली गेली, त्यावेळी 1500 मतांनी मी जिंकलो. पाच वर्षात आमदार म्हणून केलेल्या कामांमुळे 2024 मध्ये मी 52 हजार मतांनी मी निवडून आलो. भिवंडीत आज समाजवादी मुख्य भूमिकेत आहे. तेथे यावेळी समाजवादीचा महापौर होवू शकतो. मात्र अबु आझमी यांच्या एककल्ली आणि हुकूमशाही पद्धीतीच्या निर्णयामुळे पार्टीला मोठे नुकसान होणार आहे, असंही रईस शेख यांनी म्हटलं आहे.













सयाजी शिंदे यांचे स्वप्न जळून खाक, बीडच्या देवराईला दुसऱ्यांदा आग | Sayaji Shinde’s Dream Reduced To Ashes; Beed’s Devarai Set On Fire For Th
[…] […]