NEET Paper Leak Protest : दिल्लीतील जंतरमंतरवर CJP आणि विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करत आहेत..पोलिसांनी तरूणांवर लाठीचार्ज केला..अमानुष मारहाण झाल्याने अनेक मुला-मुलींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे..यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे…मात्र या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निषेध व्यक्त करण्याऐवजी राजकारण करत आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत…राहुल गांधी आणि विरोधक चर्चेपासून दूर का जात आहेत? संसदेत येऊन चर्चा करा…काँग्रेसच्या काळात अनेकवेळा पेपरफुटी झाली, असं मुख्यमंत्री म्हणाले..मात्र यावरून आता असा प्रश्न निर्माण झालाय की काँग्रेसच्या काळात ज्या गोष्टी घडल्या, जे गैरप्रकार घडले आहेत, ते भाजपच्या काळात घडणे गरजेचेच आहेत का? तुम्हाला आम्ही सुधारणा करण्यासाठी निवडून दिलं आहे..चुका कुणी काय केल्या हे सांगण्यासाठी नाही, असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे…या व्हिडिओतून पाहूयात की फडणवीसांच्या वक्तव्यानंतर नागरिकांनी काय म्हटलं आहे..फडणवीसांनी पेपरफुटीवर काय म्हटलं आहे? तरूणावर अन्याय का होत आहे?
राहुल गांधी, विरोधक आणि चर्चेवरून रंगले राजकारण :
NEET पेपरफुटी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे..त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत..कारण जी मुलं या कुटुंबाचं आधार होती, जे डॉक्टर बनवून आपल्या कुटुंबाचे कष्ट, गरीबी दूर करू शकत होते..आपल्या आई-वडिलांचा म्हातारपणी सांभाळ करणार होते, तेच कुटुंबाचे आधार NEET पेपरफुटीमुळे मातीआड गेले आहेत….NEET पेपरफुटीमुळे देशभरातील तरूणांमध्ये संतापाचे वातावरण आहे..दिल्लीत जंतरमंतरवर तरूण आंदोलन करत आहे..वरून पाऊस देखील तरुणांची कठीण परिक्षा घेत आहे..पावसामुळे जंतरमंतर परिसरात पाणी साचले आहे…तर पावसामुळे जमीन ओली झाली आहे..त्यामुळे ओल्या जमिनीवर तर तरूण झोपू शकत नाही..त्यामुळे तरूणांना जागून रात्र काढावी लागत आहे…या सर्व अडचणी असताना सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगितले…यामुळे आता देशभरात वातावरण तापले आहे..
हेही वाचा ; 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा ‘मोर्चात गुंड घुसले तर फोडून काढू’ राज ठाकरेंचा थेट इशारा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis : या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी, राहुल गांधी आणि विरोधकांनी चर्चा करावी असं म्हटलं आहे..तसंच काँग्रेसच्या काळात कर्नाटक, तेलंगणा यासह इतर राज्यात पेपरफुटी झाली आहे..असं फडणवीस म्हणाले…मात्र आंदोलन तरुणांचे सुरू आहे, तर राहुल गांधींनी का चर्चा करावी? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत..तसंच काँग्रेसच्या काळात गैरप्रकार घडत होते…त्यामुळेच 3 वेळा मोठ्या बहुमताने भाजपला निवडून दिले आहे…गेल्या 12 वर्षापासून केंद्रात भाजपची सत्ता आहे..काँग्रेसच्या काळात ज्या चुका झाल्या, त्याच सुधारण्यासाठी तुम्हाला ही सत्ता दिली आहे..त्यामुळे आता काँग्रेस किंवा इतर पक्षावर खापर फोडण्याऐवजी सुधारणा का केल्या नाहीत, असा सवालही नागरिक करत आहे…
NEET Paper Leak Protest : पीएम मोदींनी तात्काळ या पेपरफुटीवर कारवाई केली आहे..फास्ट ट्रक कोर्टात केस चालवल्या जात आहे..त्यामुळे पंतप्रधानांवर विश्वास ठेवला पाहिजे..काँग्रेसच्या काळात शिक्षणाचं बजेट खूपच कमी होतं..पण आता पीएम मोदींनी शिक्षणाचं बजेट वाढवलं आहे, असंही फडणवीस म्हणाले…मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देखील तरुणांनी आक्षेप घेतला आहे…आम्हाला माहिती आहे, पेपरफुटीनंतर मोदी सरकारने काय कारवाई केली आहे..कारवाई करा धर्मेंद्र प्रधान यांच्यावर..त्याचा राजीनामा घेणं हीच खरी कारवाई असेल असं तरुणांनी म्हटलं आहे…
ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर फडणवीसांची टीका :
NEET Paper Leak Protest : मुंबईत विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू, करत असलेल्या आंदोलानावर देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली..मी आठवण करून देतो, या राज्यातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला..IAS अधिकारी देखील यात सहभागी होते..एवढा मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही..त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर आरोप लागले होते..फक्त पेपरलीकच झालं नाही, तर नापास झालेल्यांना पास करण्याचा विक्रमही त्यांच्या काळात झाला, असं फडणवीस म्हणाले..या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.. जे उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री होते, तेच नेते आताही मंत्री आहेत, त्यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे..
तरूण आज दिल्लीत काठीने मार खात आपल्या हक्कासाठी लढत आहे..तरूण दिल्लीत उपाशी राहत, निसर्गाचा, पावसाचा मार खात आपल्याला न्याय मिळावा, यासाठी लढत आहे..मात्र देशातील सर्वच नेते या आंदोलनाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रय़त्न करताना दिसत आहे..आज माणुसकी संपलेली दिसत आहे..पोलीस एवढ्या क्रूर पद्धतीने मुला-मुलींना मारहाण करतात, पण भाजपचे एकही नेते याचा निषेध करताना दिसत नाही..तर काँग्रेसचे नेते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आता आंदोलकांची भेट घेताना दिसत आहे…जेव्हा नेत्यांची मुलं विदेशात शिकण्यासाठी जातात, तेव्हा हे विरोधक आवाज उचलून शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारवर दबाव का आणत नाहीत? पेपरफुटी झाल्यानंतर विरोधक रस्त्यावर का उतरत नाही? देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी दररोज रस्त्यावर आणि संसदेत विरोधक आवाज का उचलत नाहीत? कोणताही पक्ष असो फक्त आपली राजकीय पोळी भाजण्याची संधी मिळाली की पहिले समोर येताना दिसत आहे….









