• Home
  • देश
  • Gen Z ने इतिहास घडवला? आंदोलनाची सुरुवात ते विजयाचा शेवट.
Top News

Gen Z ने इतिहास घडवला? आंदोलनाची सुरुवात ते विजयाचा शेवट.

Gen Z Protest

Gen Z Protest : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे…गेल्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी जंतरमंतरवर आंदोलन करत होते..पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यानंतरही विद्यार्थी मागे हटले नाही..आता त्यांच्या याच कष्टाला फळ आले असून प्रधान यांनी राजीनामा दिला आहे..प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवर तरूणांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे…तरूण-तरूणी डान्स करताना दिसत आहे..तर देशातील अनेक ठिकाणी तरूण फटाक्यांची आतिषबाजी करताना दिसत आहे..या व्हिडिओतून पाहूयात हे आंदोलन कसं सुरू झालं होतं आणि यश कसं मिळालंय…विद्यार्थ्यांना किती त्रास सहन करावं लागलंय प्रधानांच्या राजीनाम्यासाठी? अभिजीत दीपकेंनी हे यश मिळवून दिलंय का? या विजयातून सोनम वागंचुक यांना वगळण्यात आलंय का?

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय?

NEET पेपरफुटी झाली आणि तरूणांमध्ये प्रचंड आक्रोश होता..यातच भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत दास यांनी तरूणांना झुरळाची उपमा दिली..ज्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला..हा रोष पाहताच अभिजीत दीपकेंनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली…त्यांनी CJP ची स्थापना करताच देशभरातील तरूणांनी याला प्रतिसाद दिला..काही तासातच CJP चे भाजप पेक्षा जास्त फॉलोवर्स झाले…हे आंदोलन डिजिटल युगात सुरू होतं..केंद्र सरकारला वाटलं हे झुरळं फक्त इन्स्टावरती रिल्स स्क्रोल करतील, यांचा काही धोका नाही…मात्र काही दिवसांनी अभिजीत दीपके भारतात आले आणि त्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचं ठरवलं…CJP ने जंतरमंतरवर पहिलं आंदोलन केलं..त्यानंतर CJP नं देशभरातील अनेक शहरात आंदोलन केलं…यानंतर CJP आणि विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचं ठरवलं..यावेळी सोनम वांगचुक यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला..त्यांनी आमरण उपोषण पुकारलं..केंद्र सरकारने 18 ते 20 दिवस या उपोषणाची दखल घेतली नाही..मात्र सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली..त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात घटल्यानंतर याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले..यावरून देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळालं…देशभरातील विद्यार्थी थेट दिल्लीकडे निघाले..

हेही वाचा : NEET आंदोलनाचा इम्पॅक्ट! राज ठाकरेंचा तरुणाईला सलाम; म्हणाले, “जेन-झीने सरकारच्या…”

CJP आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन कसं उभं केलं?

Gen Z Protest : जंतरमंतरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली…देशभरातून मोठा पाठिंबा मिळताना पाहून सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपकेंनी संसदेवर मोर्चा काढण्याचा ठरवला..मात्र अचानक दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना पाढऱ्या कपड्यातून उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं…अनेकांनी सोनम वांगचुक यांचं अपहरण करत नजरकैदत ठेवण्यासाठी पोलिसांनी उचललं अशी टीका केली…सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलताच देशभरात आक्रोश पाहायला मिळाला..सोनम वांगचुक आंदोलनात नसताना देखील तरूणांनी संसदेवर मोर्चा काढला..हा मोर्चा मोडून काढण्याचा मोदी सरकारने पूर्ण प्रयत्न केला..पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला..यावेळी पोलिसांनी खिळे असलेल्या काठ्यांनी मुलांना अमानुष मारहाण केली..पोलिसांनी मुलींचे कपडे फाडल्याचा आरोप आहे..पोलिसांनी मुलींनाही अमानुष मारहाण केली..निष्पाप विद्यार्थ्यांवर अश्रूधारांचा मारा करण्यात आला..तसंच पोलिसांनी मणिपूर, जम्मू कश्मीरमध्ये वापरण्यात आलेल्या पॅलेट गनचा देखील वापर केल्याचा आरोप आहे..या पॅलेट गनमुळे काही जणांना आपला डोळा गमवावा लागला आहे…

Jantar Mantar Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलनस्थळ नष्ट केला..पोलिसांनी स्टेज मोडून काढत जंतरमंतरकडे जाणारे रस्ते बंद केले…पण संध्याकाळ झाली आणि आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर परतले..त्यांनी पुन्हा स्टेज उभारलं आणि आंदोलन सुरू केलं..यावेळी देखील पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रय़त्न केला..पण विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले…पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले…यामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला…देभरातून विद्यार्थी दिल्लीच्या दिशेने निघाले..राहुल गांधी, अखिलेश यादव, यांच्यासह अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला..राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर आंदोलन केलं..तसंच महाराष्ट्रात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनी देखील आंदोलन केलं..वाढता राजकीय दबाव आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहून सरकारला एक पाऊल मागं घ्यावं लागलं..

दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला…दिल्लीकडे विद्यार्थी येऊ नये म्हणून सरकारने दिल्लीतील 16 हून अधिक मेट्रो स्टेशन बंद केले…जंतरमंतरकडे येणारे सर्व रस्ते बंद केले..मात्र तरीही विद्यार्थी कसेही जंतरमंतरवर पोहोचले..मात्र जंतरमंतरवर पोहोचल्यानंतरही विद्यार्थ्यांचे कष्ट कमी झाले नाहीत..दिल्लीत पाऊस हजेरी लावत होता..याच पावसात भीजत मुला-मुलींना आंदोलन करावं लागत होतं..मुलींना जंतरमंतरवर परिसरातील रस्त्यांवर उघड्यावर झोपावं लागतं होतं..मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर होता…मुलींसाठी खास काही व्यवस्था पाहायला मिळाली नाही..मुलं देखील रस्त्यावर जागा मिळेल तिथे उघड्यावर झोपताना पाहायला मिळाले…पावसात कपडे भिजत होते..खाली जमीन भिजल्यानंतर झोपायला देखील जागा नव्हती..त्यामुळे रात्र जागून काढावी लागत असे..रात्रभर जागल्यानंतर सकाळी पोलिसांची दमदाटी पाहायला मिळायची…मुला-मुलींना अन्नासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती..हे पाहिल्यानंतर काही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी समोर येत जंतरमंतरवर आंदोलकांना अन्न उपलब्ध करून दिलं..जे नागरिक आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही, त्यांनी घरी बसूनच ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी अन्न पाठवलं..फूड डिलिव्हरी बॉय एका दिवसात 10-10 वेळा जंतरमंतरकडे चक्रा मारत असे..एवढं अन्न आलं की CJP ला ट्वीट करत म्हणावं लागलं की आता माझ्याकडे खूप अन्न आहे, आता कृपया अन्न पाठवू नका..घरी बसून हे लोक आंदोलक विद्यार्थ्यांसाठी अन्न पाठवत होते..पण इकडं काही निर्दयी पोलीस हे अन्न डिलिव्हरी बॉयकडून जप्त करून घेत असे..आंदोलकांना अन्न पाठवत नव्हते..

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवर जल्लोष :

Education Minister Resignation : हे सर्व संघर्ष सुरू असताना आता आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे..यामुळे विद्यार्थ्यांच्या या कष्टाला आणि आंदोलनाला यश मिळालं आहे..प्रधान यांनी राजीनामा देताच अनेक विद्यार्थांना आनंदाश्रू अनावर झाले..तरुणांनी डान्स करत, फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला..तर अभिजीत दीपके ( Abhijit Dipke ) देखील भावूक झाले…त्यांनी स्टेजचे पाया पडत आंदोलकांचं आभार मानलं…”आम्ही हे करून दाखवले. हा देश संविधानाने चालतो हे आज सिद्ध झाले असून हा लोकशाहीचा आणि विद्यार्थी शक्तीचा मोठा विजय आहे, असं अभिजीत दीपकेंनी म्हटलं…

आज देशभरात तरुणांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे..अनेक ठिकाणी तरूण फटाक्यांची आतिषबाजी करत आहे…हे आंदोलन यशस्वी त्या लढाणाऱ्या महान मुलींमुळे आणि मुलांमुळे झालं आहे…मुली आपल्या सुरक्षेचा, जीवाची परवा न करता जंतरमंतरवर ठाण मांडून राहिल्या..तरूण देखील जंतरमंतरवर पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा सामना करत आंदोलन करत राहिले…अखेर या कष्टाला यश मिळालं आणि जेनझी काय असतात हे देखील सरकारला कळालं..कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडियावर सुरू झालेल्या मीम्सच्या माध्यमातील या आंदोलनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून विजय मिळवून दाखवला आहे..या जेनझी बाबत तुम्हाला काय वाटतं आणि हे यश कुणाकुणाचं आहे ?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts