• Home
  • राजकारण
  • धर्मेंद्र प्रधानांनंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खातं? जाणून घ्या ते कोण आहेत?
Top News

धर्मेंद्र प्रधानांनंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खातं? जाणून घ्या ते कोण आहेत?

Pralhad Joshi Education Minister

Pralhad Joshi Education Minister : NEET पेपरफुटी झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच संताप पाहायला मिळाला..CJP आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय..राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानुसार हा राजीनामा त्वरित मंजूर केला आहे…तर शिक्षण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण अतिरिक्त जबाबदारी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Pralhad Joshi Education Minister : धर्मेंद्र प्रधानांनंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे :

कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी पेपरफुटीमुळे प्रचंड संतापलेले होते…तरुणांनी लाठीचार्जनंतरही जंतरमंतरवर आंदलन सुरूच ठेवलं..याचे पडसाद विविध राज्यांमध्ये दिसायला लागले… अखेर या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली… देशातील तरुण शक्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून, तसेच या परिस्थितीचा कोणताही देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, म्हणून आपण पद सोडत असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केलं…

हेही वाचा  : Gen Z ने इतिहास घडवला? आंदोलनाची सुरुवात ते विजयाचा शेवट.

मोदी सरकारमध्ये प्रल्हाद जोशी यांनी कोणती मंत्रालये सांभाळली?

Pralhad Joshi Education Minister : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील अनुभवी नेत्यांपैकी एक असलेल्या प्रल्हाद जोशी ( Pralhad Joshi )यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे.. प्रल्हाद जोशी हे सध्या मोदी सरकारमध्ये ‘ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण’ तसेच ‘नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा’ या दोन महत्त्वाच्या मंत्रालयांचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत… आता त्यांच्याकडे या आधीच्या विभागांसह देशाच्या शिक्षण व्यवस्थेची कमान सांभाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे…

कर्नाटक राज्यातील धारवाड लोकसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले प्रल्हाद जोशी हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते मानले जातात… 2014 ते 2016 या काळात त्यांनी भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्षपद भूषवले होते.. तसेच, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे… संसदेचे कामकाज सुरळीत चालवणे आणि विविध पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधण्यात ते नेहमीच यशस्वी ठरले आहेत..

Pralhad Joshi Education Minister : प्रल्हाद जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेची (NTA) आणि देशातील स्पर्धा परीक्षांची ढासळलेली विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणे हे त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असेल… देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकवर्गात असलेला रोष शांत करणे, परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणणे आणि भविष्यात पेपर लीकसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर, तातडीची पावले उचलणे, या आघाड्यांवर त्यांना तातडीने काम करावे लागणार आहे…जोशी यांच्याकडे सध्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त कारभार देण्यात आले आहे…त्यामुळे नवीन शिक्षण मंत्री कोण होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts