Dharmendra Pradhan Resignation : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विठ्ठल पावल्याचे दिसून येत आहे..कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करत होते..विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी तरुणांना बेदम मारहाण केली..या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाच वातावरण निर्माण झालं होतं..विद्यार्थी देशभरातून दिल्लीकडे रवाना झाले..वाढती आंदोलकांची गर्दी पाहून आणि देशभरात वाढता संताप पाहता केंद्र सरकार अखेर झुकले आहे…शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे…ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्यावरून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली..मुला-मुलींना जंतरमंतरवर उघड्यावर, ओल्या जमिनीवर झोपावं लागलं..धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थ्यांचे एवढे हाल झाल्यानंतर घेण्यात आला आहे..यावरून कळतं की सरकार किती बेजबाबदार आहे..या व्हिडिओतून पाहूयात की केंद्र सरकारला का झुकावं लागलं? काँक्रोच जनता पार्टीला यश कसं मिळालंय?
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप
NEET Paper Leak : NEET पेपरफुटी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली…तर लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला..त्यामुळे तरूणांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला..हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी तरुण थेट दिल्लीकडे निघाले…दिल्लीत हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलनासाठी जमा झाले…यावेळी सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनी देखील विद्यार्थ्यांची साथ दिली..त्यांनी आमरण उपोषण पुकारलं आणि या आंदोलनाला बळ मिळालं..त्यांची प्रकृती बिघडल्याची अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि विद्यार्थ्यांसह नागरिक देखील दिल्लीकडे निघाले…पोलिसांनी लाठीचार्ज करत, अश्रू धुरांचा मारा करत आंदोलन चिरडण्याचा प्रय़त्न केला..विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप आहे..पोलिसांनी मुलींचे कपडे फाडल्याचाही आरोप आहे..हे सर्व घडत असताना, पोलीस विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करत असताना तरुण घाबरले नाही..त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले…
देशभरात आंदोलन पसरत असल्याने आणि जेनझी मुलांच्या आंदोलनाची तीव्रता पाहता मोदी सरकारला विद्यार्थ्यांची गोष्ट ऐकावी लागली… केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे…दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनासमोर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आहे… ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते..
हेही वाचा : ब्रेकिंग न्यूज! धमेंद्र प्रधानांचा राजीनामा; CJP च्या आंदोलनाला अखेर यश, पत्रात नेमकं काय लिहिलं?
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा? विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकलं
Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती अधिकृत सोशल मीडिया अकाउंट ‘X’ वर पत्र पोस्ट करून जाहीर केली… देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर आणि राजकीय कचाट्यात अडकू नये, तसेच देशविरोधी शक्तींनी जंतर-मंतरवरील या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये, म्हणून आपण स्वेच्छेने पद सोडत असल्याचे प्रधान यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे…
NEET च्या पेपरफुटीमुळे देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले होते… सरकारने या प्रकरणाचा तपास तातडीने सीबीआयकडे सोपवला आणि त्यानंतर रिनीट परीक्षाही घेण्यात आली होती… तात्काळ त्याचे निकालही जाहीर झाले, परंतु मूळ दोषींवर कठोर कारवाई न झाल्याने आणि परीक्षा पद्धतीतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.. शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सुरुवातीला गांभीर्याने न पाहिल्याचा आरोप करत हे आंदोलन अधिकच चिघळले..
या देशव्यापी आंदोलनाचे मुख्य केंद्रबिंदू दिल्लीतील जंतर-मंतर मैदान होते. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.. केंद्र सरकार आणि CJP च्या प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या तिसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वीच CJP ने स्पष्ट केले होते की, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा आमच्यासाठी ‘नॉन-नेगोशिएबल’ म्हणजे ज्यावर कोणतीही तडजोड होणार नाही अशी मुख्य मागणी आहे… दिल्लीतून सुरू झालेल्या या आंदोलनाचा देशभरात वणवा पसरला होता.. मुंबई, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, गुवाहाटी, अरूणाचल प्रदेश , उत्तर प्रदेश यासह इतर ठिकाणी देखील आंदोलन केले जात होते… काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनात थेट भूमिका घेतली होती…महाराष्ट्रातील नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर नेतही विद्यार्थ्यांना पाठींबा देत मैदानात उतरले होते.. ज्यामुळे सरकारवरील राजकीय दबाव प्रचंड वाढला होता…
Dharmendra Pradhan Resignation : यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे…धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात भावूक आणि संयमी भूमिका घेतली आहे… आपण गेल्या चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी समर्पित राहिल्याचे सांगत त्यांनी देशातील तरुणांच्या भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा आदर केला.. जंतर-मंतर आणि देशाच्या इतर भागांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता, कोणत्याही देशविरोधी घटकाने याचा गैरफायदा घेऊ नये, देशाची एकात्मता टिकून राहावी आणि आपल्या मुलांचे लक्ष अभ्यासावरून विचलित होऊ नये, म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.. हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नसून देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले, तसेच यापुढेही देशातील तरुणांची सेवा करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला..
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागील प्रमुख मागण्या
Education Minister Resignation : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014 पासूनच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलने झाली आहेत..ज्यामध्ये शेतकरी आंदोलन आणि CAA विरोधी आंदोलनांचा समावेश आहे.. मात्र, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला थेट जनआंदोलनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या दबावामुळे आपला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच घटना आहे.. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संसदेच्या आगामी अधिवेशनात होणारी कोंडी टाळण्यासाठी, तरुण पिढीचे मतदान गमवण्याची भीती, यामुळे भाजप हायकमांडने हा अत्यंत कठीण निर्णय घेतल्याची माहिती आहे…
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी येताच जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरू केला असून CJP आणि विद्यार्थी संघटनांनी याला विद्यार्थी शक्तीचा मोठा विजय असं म्हटलं आहे… आता देशाचे नवीन शिक्षणमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत…ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत..त्यामुळे आता देशाचे नवे शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीस तर होणार नाहीत ना? अशी चर्चा सुरू झाली आहे..तुम्हाला काय वाटतं देशाचे नवे शिक्षणमंत्री कोण होईल?









