Live Update: दिल्लीतील संसद भावनाच मुख प्रवेशद्वार बंद
दिल्लीतील संसद भावनाच मुख प्रवेशद्वार बंदLive Update: अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलं
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांनी सुरू केलेले उपोषण अखेर मागे घेतले आहे. सोनम वांगचूक यांच्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण अभिजित दिपके यांच्यासह नेहा, मनीष आणि अमित यांनीही सोडले आहे. आंदोलनकर्त्यांनी पुढील भूमिका आणि मागण्यांबाबत चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
Marathi Breaking News Live Updates: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात हिंगोलीत आंदोलन; नागरिकांनी रोखला राज्य मार्ग
वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती आणि वाढीव वीज बिलांच्या तक्रारींवरून हिंगोली जिल्ह्यात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. या मुद्द्यावर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली.
औंढा-जिंतूर राज्य मार्गावरील रामेश्वर गावाजवळ हे आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर झटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
आंदोलकांनी स्मार्ट मीटर योजनेबाबत नाराजी व्यक्त करत वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Mumbai Live Update: सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनार्थ नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलनदिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून नवी मुंबईत निदर्शने करण्यात आली. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. आंदोलकांनी संबंधित मुद्द्यांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
Ahilyanagar Live Update: वांगचूकांच्या अटकेवरून अहिल्यानगरात आंदोलनसोनम वांगचूक यांच्या कारवाईच्या निषेधार्थ अहिल्यानगरात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संबंधित प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान आणि मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
Live Update: लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधक आक्रमकलोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात आवाज उठवला. महत्त्वाच्या विषयांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी करत विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Marathi Breaking News Live Updates: राज्यातील पावसाची स्थिती, राजकीय घडामोडी, सोनम वांगचूक आंदोलनातील ताज्या घडामोडी, संसदेच्या अधिवेशनातील महत्त्वाच्या बातम्या, आषाढी वारीचे अपडेट्स तसेच देश-विदेशातील घडामोडींची प्रत्येक माहिती मिळवा एका क्लिकवर.









