• Home
  • ताज्या बातम्या
  • मोठी बातमी! अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलं; वांगचूक यांच्या विनंतीनंतर निर्णय
ताज्या बातम्या

मोठी बातमी! अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलं; वांगचूक यांच्या विनंतीनंतर निर्णय

Abhijeet Dipke

Abhijit Dipke: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचूक गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषण करत होते.

जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांनी आपले उपोषण अखेर मागे घेतले आहे. सोनम वांगचूक यांच्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणात सहभागी असलेले नेहा, मनीष आणि अमित यांनीही उपोषण सोडले आहे. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांवर ठाम राहत पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. दरम्यान, CJP कडून आज संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अजून अपडेट लोड होत आहे….

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts