CJP Protest Mumbai : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात वातावरण तापलेले असताना आता सीजेपी देखील ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक पाहायला मिळत आहे…ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे…मात्र सीजेपीला पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे…त्यामुळे काँक्रोच जनता पार्टीचं आंदोलन महायुती सरकारने मोडून काढल्याची चर्चा आहे….
तर सीजेपी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यावर ठाम आहे…कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सीजेपी करताना दिसत आहे…त्यामुळे पाहूयात की सीजेपीला आंदोलनाला परवानगी मिळणार का? सीजेपीचं आंदोलन महायुती सरकारने मोडून काढलं का? सीजेपी आता काय करणार? जंतरमंतर 2.0 होणार का?
CJP ला मुंबईतील आंदोलनाची परवानगी का नाकारली? ( CJP Protest Mumbai )
ज्ञानेश कुमार फक्त आणि फक्त भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी आणि देशभरात भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी काम करत असल्याची त्यांच्यावर टीका होत आहे…त्यांनी बेकायदेशीरपणे कोट्यवधी मतदारांची नाव कमी करून त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे…त्यांच्या कार्यभारावर इतर आयुक्तांनी आक्षेप घेतल्यानंतरही त्यांनी कुणाचेही ऐकले नाही, असाही आरोप आहे…त्यांच्या या भोंगळ कारभार पत्रकार रितिका चोपडा यांनी समोर आणला आणि देशभरातून निवडणूक आयोगावरील विश्वास उडाला आहे…विरोधक आपल्या आपल्या पद्धतीने मोदी सरकारला आणि ज्ञानेश कुमार यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत…तर सीजेपी आपल्या पद्धतीने ज्ञानेश कुमार यांना आणि मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे…सीजेपीने गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदा मोदी सरकारला झुकवत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्यास भाग पाडलं होतं….यानंतर आता सीजेपी दुसऱ्यांदा मोदी सरकारला झुकवण्याच्या तयारीत आहे….
मात्र यावेळी केंद्र सरकारने देखील आपली रणनीती बदलली आहे…तर सीजेपीने देखील मोदी सरकारचा डाव ओळखत आपल्या आंदोलनात बदल केला आहे….सीजेपी जंतमंतरवर आंदोलन न करता आता मुंबईतून आंदोलनाला सुरूवात करत आहे…कारण सीजेपीला देखील माहिती आहे की, पहिल्यांदा ज्या चुका झाल्या त्या चुका मोदी सरकार करणार नाही…केंद्र सरकार आंदोलन दडपण्याचा पूर्ण प्रयत्न करेल…यामुळे आता सीजेपीने थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आंदोलन करण्याचं ठरवलं आहे…
सीजेपीने जरी मुंबईत जेलभरो आंदोलन करण्याचं ठरवलं असलं तरीही फडणवीस सरकारने या आंदोलनाला परवानी नाकारली आहे….पोलिसांनी आंदोलनाची परवानी नाकारत शिवाजी पार्कवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे…मात्र सीजेपी आंदोलन करण्यावर ठाम आहे…..यामुळे शिवाजी पार्कच्या सहाही प्रवेशद्वारांबाहेर बॅरिकेडिंग केले असून, संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे…पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर अभिजीत दीपके आक्रमक पाहायला मिळाले…
हेही वाचा : “बाबा, माझे आठही मित्र बुडाले…”; शिवचा फोन अन् कुटुंबीयांच्या काळजात धस्स, दिवेआगर दुर्घटनेने आळंदी हादरली
‘जेल भरो आंदोलन’ नेमकं काय आहे? ( CJP Jail Bharo Andolan )
महात्मा गांधींना कधी ब्रिटिशांनी परवानगी दिली होती का? तरीही आंदोलन करावं लागलं…आम्ही देखील आंदोलन करणारच आहे…तीन दिवस नाहीतर, तीन महिने आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल… पण मी रस्त्यावर पुन्हा येईल पुन्हा येईल, असं म्हणत अभिजीत दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिलाय..शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री रॅली करू शकतात तर आम्ही आंदोलन का करू शकत नाही, असा सवालही दीपकेंनी ( Abhijit Dipke ) केला…
अमित शहांनी जी चुकी केली होती, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये ….जर आंदोलन मोठा करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अटक करावी…ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार आहेत…त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत…त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत, असं दीपके म्हणाले…तसंच मी माझी डिग्री कधीही दाखवायला तयार आहे… पंतप्रधानांनी आपली डिग्री दाखवावी… मी माझ्या शिक्षणासाठी घेतलेले लोन देखील दाखवायला तयार आहे, असंही दीपके म्हणाले…
मुंबईनंतर CJPचा पुढचा प्लॅन काय? ( Abhijit Dipke )
सीजेपीला मुंबईत आंदोलन करण्यापासून रोखण्यात येत असल्याने आता देशभरात वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे…तरूणांनी देशातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे…तर मुंबईतील सीजेपीच्या आंदोलनाला शरद पवार गटाने आपला पाठिंबा दर्शवला आहे…ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी तर आक्रमक होत मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे… ‘फडणवीसांनी सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी दिली पाहिजे होती’..दिपकेंनी लग्नाची, डीजेची परवानगी मागितली होती का?…आदित्य ठाकरे आंदोलनात जाणार, अटकेलाही तयार आहे…सीजेपीचं आंदोलन यशस्वी होणार, कुमारांना जावंच लागेल, असं संजय राऊत म्हणाले…
आता सध्या तरी पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही…मात्र राज्यभरासह देशभरात वाढता रोष पाहून पोलीस सीजेपीला मुंबईत आंदोलनाला परवानगी देणार का? सीजेपीच्या आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफूटवर येणार का? ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…









