Marathi Movie On OTT : वेगळ्या नावामुळे चर्चेत आलेला ‘पाच फुटाचा बच्चन’ हा मराठी चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. Amazon Prime Video वर हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. (Release OTT movie) सामाजिक समता, संतविचार आणि एका महिला कीर्तनकाराची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाला थिएटरमध्येही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
सध्या मनोरंजन विश्वात मराठी चित्रपटांची चर्चा रंगताना दिसत आहे. त्यातच आपल्या अनोख्या नावामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. थिएटरमध्ये हा सिनेमा पाहण्याची संधी हुकलेल्या प्रेक्षकांना आता घरबसल्या Amazon Prime Video वर त्याचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.
‘पाच फुटाचा बच्चन’ कुठे आणि कधी पाहता येणार?
‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट आता Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात न जाता आपल्या सोयीनुसार हा सिनेमा पाहता येईल. (Pach Futacha Bachchan OTT Release)चित्रपटाच्या वेगळ्या विषयामुळे आणि नावामुळे सुरुवातीपासूनच त्याची चर्चा होती. आता OTT वर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
या चित्रपटाच्या कथेत एका महिला कीर्तनकाराची व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. कीर्तनपरंपरेचा खरा अर्थ काय, संतविचारांचा समाजाला नेमका कोणता संदेश मिळतो आणि समतेचे महत्त्व काय, (Marathi Movie OTT Release)अशा अनेक मुद्द्यांवर हा सिनेमा भाष्य करतो. सध्या भोंदू कीर्तनकारांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खऱ्या कीर्तनपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव, समता आणि संतविचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा चित्रपटाचा प्रयत्न आहे.
हेही वाचा : ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! ५ दिवसांत जगभरात किती कोटींची कमाई? जाणून घ्या…
कलाकारांच्या अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने
या चित्रपटात श्रुती मधुदीप हिने महिला कीर्तनकाराची भूमिका साकारली आहे. आपल्या अभिनयातून तिने व्यक्तिरेखेला प्रभावीपणे न्याय दिला आहे. याशिवाय अभिनेते किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे आणि क्षितीश दाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नवोदित कलाकारांनीही आपल्या अभिनयातून चित्रपटाला चांगली साथ दिली आहे. (Marathi starcast)चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले आहे. तर राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील गाणी, संगीत आणि खुसखुशीत संवाद हीदेखील त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.
कुटुंबासोबत पाहण्यासारखा मराठी सिनेमा
समाजातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून प्रेम, सहजीवन आणि समानतेचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश हा चित्रपट देतो. संतविचारांची शिकवण आणि मानवी मूल्यांची जाणीव करून देणारा हा सिनेमा केवळ मनोरंजन करत नाही, तर प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतो. त्यामुळे मराठी चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी ‘पाच फुटाचा बच्चन’ हा OTT वरील एक वेगळा पर्याय ठरू शकतो.
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.









