• Home
  • ताज्या बातम्या
  • भरत जाधव यांची साथ, ‘गेला बापट कुणीकडे’ची धमाल! रंगभूमीवर येणार नवं विनोदी नाटक
मनोरंजन

भरत जाधव यांची साथ, ‘गेला बापट कुणीकडे’ची धमाल! रंगभूमीवर येणार नवं विनोदी नाटक

Marathi Theatre News
20
Marathi Theatre News : ‘बापट’ या नावाची सध्या सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता याच नावाची रंगभूमीवरही एन्ट्री होणार आहे. अभिनेता भरत जाधव यांची साथ लाभलेलं ‘गेला बापट कुणीकडे’ हे नवं विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिसेंबरमध्ये पुणे आणि मुंबईत या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.

सध्या प्रसारमाध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत ‘बापट’ हे नाव वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. डीजेचा दणदणाट असो, ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा असो किंवा त्यावरून व्हायरल होणारे मीम्स… ‘बापट’ हे नाव चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. याच चर्चेत आता रंगभूमीवरही एका ‘बापट’ची भर पडणार आहे. (Marathi Entertainment News) मात्र, या बापटांचा सध्याच्या बातम्यांशी, कोणत्याही वादाशी किंवा चर्चेतल्या व्यक्तींशी काहीही संबंध नाही. कारण हा आहे राम बापट! एका साध्या, सरळ माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या भन्नाट गोंधळाची गोष्ट सांगणारं नवं विनोदी नाटक म्हणजे ‘गेला बापट कुणीकडे’.

राम बापटच्या आयुष्यात नेमकं घडतंय तरी काय?

नावात साधर्म्य असलं, तरी विषयात मात्र पूर्ण वेगळेपण असलेल्या या नाटकातून प्रेक्षकांना हास्याची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. (Upcoming Marathi Plays) राम बापटच्या आयुष्यात नेमकं असं काय घडतं, की सगळ्यांनाच प्रश्न पडतो, ‘गेला बापट कुणीकडे?’ याचं उत्तर शोधताना रंगणारा गोंधळ, घडणारे विनोदी प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. हास्य, गोंधळ आणि नात्यांची भन्नाट गुंतागुंत उलगडणारं हे विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे.

भरत जाधव यांची नाटकाला साथ

‘भरत जाधव एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत आणि ‘ब्रह्मांडनायक पिक्चर्स’ निर्मित ‘गेला बापट कुणीकडे’ या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन आणि गीतलेखन राजेश देशपांडे यांनी केलं आहे. (Marathi Comedy Drama) नाटकाची निर्मिती हार्दिक मोगावीरा, तर सहनिर्मिती राम राणे यांची आहे. मिलिंद फाटक आणि पूर्णिमा तळवलकर यांच्यासह शार्दूल सराफ, गौरी सुखटणकर, पालवी कदम, चिंतन लांबे, राम राणे आणि विजय मिरगे हे कलाकार आपल्या अभिनयातून या गोष्टीला रंगत आणणार आहेत. खुसखुशीत संवाद, भन्नाट प्रसंग आणि गैरसमजांची गुंतागुंत यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा नाटकाच्या टीमचा प्रयत्न आहे.

भरत जाधव म्हणाले, नाटकाच्या यशस्वी प्रवासासाठी सक्रिय पाठिंबा देणार

या नाटकाचे प्रस्तुतकर्ते आणि अभिनेते भरत जाधव यांनी नाटकाच्या प्रवासाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘चांगली कलाकृती केवळ निर्माण होऊन चालत नाही, तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला मोठं करण्याची जबाबदारीही आपली असते. (Marathi Natak)दर्जेदार कलाकृतीला योग्य पाठबळ मिळालं, तर ती अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचू शकते. या नाटकाचे मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग व्हावेत, प्रत्येक शहरात आणि गावात ते रसिकांपर्यंत पोहोचावं, ही माझी मनापासून इच्छा आहे. या नाटकाच्या यशस्वी आणि व्यापक प्रवासासाठी माझे आशीर्वाद तर आहेतच, पण गरज पडेल तिथे माझा सक्रिय पाठिंबाही कायम असेल!’

कोरोना काळात सुचली नाटकाची कथा

नाटकाचे लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकाच्या निर्मितीमागची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “‘बापट’ या नाटकाची कथा मला कोरोना काळात सुचली. मात्र, नाटकाचे नाव सध्या चर्चेत असलेल्या ‘बापट’ प्रकरणावरून सुचले आहे. नावातील या मिश्कीलपणामुळे नाटकाबद्दल उत्सुकता निर्माण होते; मात्र नाटकाची कथा पूर्णपणे वेगळी आणि रंजक आहे. लेखक म्हणून कथेशी मनापासून जोडला गेलो, तर प्रेक्षकही तिच्याशी जोडले जातात, असा माझा विश्वास आहे. भरत जाधव यांची साथ, निर्मात्यांचा विश्वास आणि संपूर्ण टीमच्या पाठबळामुळे हे नाटक साकार झाले. नावातील मिश्कीलपणा आणि भन्नाट विनोदातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

हेही वाचा : Marathi Movie On OTT : ‘पाच फुटाचा बच्चन’ आता OTT वर! घरबसल्या पाहता येणार मराठी सिनेमा; जाणून घ्या कधी आणि कुठे?

मिलिंद फाटक आणि पूर्णिमा तळवलकर यांनीही व्यक्त केला आनंद

अभिनेते मिलिंद फाटक म्हणाले, “‘गेला बापट कुणीकडे’ हे नावच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे! या नाटकाच्या निमित्ताने दगडाचं सोनं व्हावं, तसाच काहीसा अनुभव येतोय. भरत जाधव आणि राजेश देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद वेगळाच आहे. भरत जाधव हे नाव जिथे असतं, तिथे हाऊसफुल्लचा बोर्ड लागण्याची परंपराच आहे. त्यामुळे हे नाटकही रसिकांच्या पसंतीस उतरून हाऊसफुल्ल होईल, असा मला ठाम विश्वास आहे!’ (Marathi Starcast)

तर अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच विनोदी नाटकात काम करत आहे आणि या निमित्ताने खूप काही शिकायला मिळत आहे. मुळात राजेशचं लेखन इतकं सशक्त आहे की त्यातून विनोद आपसूकच निर्माण होतो. त्यामुळे विनोदनिर्मितीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. असं दर्जेदार लेखन असलेल्या नाटकाचा भाग होता येणं, ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे!”

नाटकाच्या पडद्यामागे कोणाची जबाबदारी?

नाटकाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार देवल यांनी सांभाळली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून, वेशभूषा महेश शेरला आणि रंगभूषा उदय तांगडी यांची आहे. गोट्या सावंत यांनी सूत्रधाराची जबाबदारी सांभाळली आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, तर अनुदीप जाधव यांचे व्यवस्थापन आहे.

पुणे आणि मुंबईत डिसेंबरमध्ये रंगणार शुभारंभाचे प्रयोग

‘गेला बापट कुणीकडे’ या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग डिसेंबर महिन्यात पुणे आणि मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत.

  • ५ डिसेंबर २०२६, शनिवार: दुपारी १२:३० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
  • ६ डिसेंबर २०२६, रविवार: सायंकाळी ५ वाजता, विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर.
  • १३ डिसेंबर २०२६, रविवार: रात्री ८:३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, मुलुंड.
  • १५ डिसेंबर २०२६, मंगळवार: दुपारी ४ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली.

नावातील मिश्कीलपणा, कलाकारांची फौज आणि भरत जाधव यांची साथ यामुळे ‘गेला बापट कुणीकडे’ या नाटकाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता रंगभूमीवर राम बापट नेमका कुठे जातो, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे!

LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

img

Shivani

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts