मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे आज जिल्हा दौऱ्यावर आले असून लोणार, मेहकर भागात झालेल्या अतिवृष्टी भागाची त्यांनी पाहणी केली आहे. सोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, तहसीलदार सह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.