रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती झाली आहे. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर इंदापूरमध्ये भरणे यांनी “काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्यांची नोंद ठेवली जाते” असे विधान करत वाद ओढवून घेतला. यावरून चर्चेला उधाण आलं असून, अशा प्रकारचे मार्गदर्शन कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.