ANC – रक्षाबंधन आणि श्रावण महिन्यानिमित्त टपाल विभागातर्फे एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राखी आणि गंगाजल पार्सल पाठविण्याची सुविधा टपाल विभागाने सुरू केली आहे. टपाल कार्यालयांमध्ये केवळ 30 रुपयांत गंगाजलाची बाटली उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर 12 रुपयांत 20 ग्रॅम वजनाची राखी देशातील कोणत्याही भागात पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक वजन असल्यास प्रत्येक अतिरिक्त 5 ग्रॅमसाठी निश्चित दर आकारण्यात येतो. शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.












