बातमी लावल्याच्या रागातून पत्रकारांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. अकोल्याच्या जनता भाजी बाजारात पाच ते सहा तरुणांनी कोयत्याने हल्ला चढवला, ज्यात चार जण जखमी झाले आहेत. तडीपार संदर्भात प्रकाशित केलेल्या बातमीवरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी या संदर्भात पोलिसांवर टीका केली आहे.












