महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित गोट्या गीते पुन्हा चर्चेत आला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान करताना त्याने EVM मशीनसमोर स्वतःचा लाईव्ह व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे आदर्श आचारसंहिता आणि मतदान गोपनीयतेचा थेट भंग झाला आहे. फक्त गोट्याच नव्हे, तर त्याच्या मित्रांचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सामान्य नागरिकांवर अशा कृतीसाठी गुन्हे दाखल होतात, मग गोट्यासाठी वेगळा नियम का? संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला का थांबवलं नाही, असा सवाल उपस्थित होतो आहे. परळीत अशा प्रकारे गुंडागिरीतून मतदान झालं का? यावरही आता संशय व्यक्त होत आहे.