चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात अभिजीत बारजवळ भीषण अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू, तर तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अजय मंडल यांचा मृत्यू झाला असून केदार मंडल, मनोजकुमार मंडल आणि साईनाथ कोहपरे हे गंभीर जखमी झाले आहेत. चौघे रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव ट्रकने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गोंडपिपरी पोलीस पुढील तपास करत आहेत. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
(i/p Byte )












