अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अधिक टॅरिफ लावण्याचा इशारा दिल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ठाम प्रत्युत्तर दिलं. रशियन तेल आयातीवरची टीका अन्यायकारक आणि अव्यवहार्य आहे, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं. भारताची रशियासोबतची ऊर्जा भागीदारी ही राष्ट्रहिताची गरज असून, ती पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. भारताने स्पष्ट केलं की, देशहितासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात आम्ही मागे हटणार नाही!
(BS)












