धर्मस्थळातील सामूहिक दफन प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथकाला मोठा धक्कादायक शोध लागला आहे. ४ ऑगस्ट रोजी नेत्रावती नदीजवळील ११व्या ठिकाणी सांगाड्याचे काही भाग आणि साडीचे अवशेष आढळले आहेत. SITने आतापर्यंत १० ठिकाणी उत्खनन केले असून, हे दुसरे प्रकरण आहे जिथे सांगाड्याचे अवशेष सापडले. माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या विनंतीवरून SITने मूळ नियोजन बदलून ११व्या बिंदूकडे लक्ष केंद्रीत केलं. उत्खनन अद्याप सुरू असून तपास आणखी खोलवर जाण्याची शक्यता आहे.












