15 ऑगस्टनंतर जर तुमच्या वाहनावर HSRP नसेल, तर थेट कारवाईची तयारी ठेवा! RTOने तिसऱ्यांदा आणि शेवटची मुदत दिली आहे. आतापर्यंत २३ लाख गाड्यांवर ही प्लेट बसवली असून, ४० लाख ऑर्डर प्रलंबित आहेत. मात्र १ कोटी ३५ लाख वाहनधारक अजूनही दुर्लक्ष करत आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही कायदेशीर गरज आहे, आणि आता तिची टाळाटाळ महागात पडणार आहे. वेळेत ऑर्डर न दिल्यास ₹500 ते ₹1000 दंड भरावा लागेल. शेवटची संधी – तीही वाया जाऊ देऊ नका!












