मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममध्ये कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या धार्मिक कार्यक्रमात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीवर नियंत्रण न राहिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यातील दोन भाविकांची प्रकृती अत्यवस्थ आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. धार्मिक कार्यक्रमांचे योग्य नियोजन न झाल्यास श्रद्धा जीवघेणी ठरू शकते, याचा हा जागा करणारा इशारा आहे.
(trending )