मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा तालुक्यातील महगावन केवळारी भागात प्रचंड सोन्याचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या दीर्घ अभ्यासानंतर या खजिन्याचा शोध लागला आहे. सुमारे १०० हेक्टर परिसरात हे सोनं, तांबं व इतर मौल्यवान खनिजांचं अस्तित्व रासायनिक विश्लेषणातून स्पष्ट झालं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे मध्य भारतातील अलीकडील काळातील सर्वात मोठं खनिज शोध असू शकतं. यामुळे जबलपूरचं नाव सोन्याच्या नकाशावर झळकणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळू शकते.












