“भारत रशियाला इंधन पुरवतोय, आणि त्यामुळे युद्धखोरीला चालना मिळते!” – असं म्हणत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातींवर “मोठ्या प्रमाणावर” टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताच्या आयात धोरणावर तसेच टॅरिफ संरचनेवर तीव्र टीका केली. फार्मा क्षेत्रावर सुरुवातीला लहान टॅरिफ लावणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. ट्रम्प म्हणाले, “ऊर्जेचे दर आणखी $10 ने खाली आले, तर पुतिनची अर्थव्यवस्था कोलमडेल.” दरम्यान, भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेसोबत चर्चेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. ट्रम्पच्या धमकीमुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधांवर ताण वाढण्याची शक्यता आहे.












