“उपदेश नको, स्वतःचा आरसा बघा!”—अशा शब्दांत भारताने रशियन तेल आयातीवरून अमेरिका व युरोपियन युनियनच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, भारताने रशियाकडून तेल खरेदी तेव्हाच सुरू केली जेव्हा युरोप स्वतःच्या गरजांसाठी तिकडे वळला, तेही अमेरिकेच्या प्रोत्साहनाने! १.४ अब्ज नागरिकांसाठी स्वस्त व स्थिर ऊर्जा गरज असल्याचं भारताने स्पष्ट केलं. याशिवाय, युरोपने २०२४ मध्ये रशियाशी €67.5 अब्जचे व्यवहार केले, तर अमेरिका अजूनही रशिया कडून युरेनियम, खते व पॅलेडियम आयात करते, याकडेही लक्ष वेधलं. भारताने ठामपणे सांगितलं की, आपल्या राष्ट्रीय हितासाठी आवश्यक ते सारे पाऊल उचलले जाईल.