राज्यातील विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्य शासनाने घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे. या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे..त्यामुळे 65 वर्षावरील आणि एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे..बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण 51 हजार 430 लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली आहे. शासनाच्या ही बाब निदर्शनास आली की एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला आणि 65 वर्षावरील महिला सुद्धा लाभ घेत आहे.या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाला दिले आहे.












