कोल्हापुरातील माधुरीनंतर सांगलीच्या गौरी हत्तीणीवरून नवा वाद पेटला आहे. तासगाव येथील पंचायतन संस्थेच्या विश्वस्तांनी ‘वनतारा’ संस्थेवर दोन ते तीन कोटींची ऑफर, अनफिटचे बनावट प्रमाणपत्र आणि हत्तीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी गौरीच्या रक्षणासाठी सह्यांची मोहीम राबवण्याची घोषणा केली. ‘वनतारा’कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही.