उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे गावाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक घरं, दुकाने, लॉज, बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली. सोलापूरमधील चार भाविक या दुर्घटनेत अडकले असून, पुराच्या पाण्याने गावाला गिळंकृत केले. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून, भारतीय सैन्याचा कॅम्प देखील वाहून गेला आहे.