सांगलीच्या खानापूर येथील आळसंद गावात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी सुनिता जाधवच्या मृत्यूचा दुःख सहन न करत, पती धनाजी जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 2 ऑगस्ट रोजी सुनिता यांचे निधन झाले होते, आणि त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी पतीचा मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.