कोरोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात बनावट कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.
कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात 30 खाटांचे आणि मालेगाव सामान्य रुग्णालयात 10 खाटांचे मॉड्युलर आयसीयू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्या कंपनीला काम सोपवण्यात आले ती कंपनी बनावट परवाना वापरत असल्याचे आढळून आले. यात जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याची पत्नी आणि वडील त्या कंपनीचे समभागधारक असल्याचेही चौकशीत उघड झाले. यामध्ये 11 कोटींची सरकारची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे












