सोलापूरमध्ये गुरुवारी सायंकाळी गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक शरणू हांडे याचे अपहरण झाले. राजकीय वैमनस्यातून अमित सुरवसे यांनी शरणू हांडे याचे घराजवळून अपहरण करून कर्नाटकमध्ये नेले. आरोपींनी शरणूला गाडीत मारहाण केली आणि त्याचे हात-पाय बांधले. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून आरोपींना झळकी (कर्नाटका) येथून ताब्यात घेतले. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली असून, गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी केली आहे. शरणू हांडे यांच्या मांडीत जखम झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.