मालेगाव तालुक्यातील खंडाळा येथील अडोळ मध्यम सिंचन प्रकल्प सततच्या पावसामुळे तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला आहे. मागील काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी, गेल्या दोन दिवसांत पावसामुळे तो वाढला आहे. प्रकल्पाजवळील व नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरण्याची भीती वाढली असून, पिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.












