बीडच्या परळीतील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी आज ४३,९६२ मतदार १०८ केंद्रांवर मतदान करतील. ४ जागा बिनविरोध निवडल्या असून, मतदान सकाळी ८ वाजता सुरू झाले आहे. बीडसह विविध जिल्ह्यांतही मतदान केंद्र उभारले आहेत. १२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.