इगतपुरीतील नामांकित रिसॉर्टवर सीबीआयच्या कारवाईत अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस आले. ५ आरोपी अटकेत असून, 1.20 कोटी रोकड, 500 ग्रॅम सोने,7 लक्झरी कार, 44 लॅपटॉप व 71 मोबाईल जप्त करण्यात आले. ‘अमेझॉन सपोर्ट सर्व्हिस’च्या नावाखाली अमेरिका, कॅनडा व परदेशी नागरिकांची गिफ्ट कार्ड व क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. ६२ कर्मचारी प्रत्यक्ष फसवणुकीच्या वेळी रंगेहाथ पकडले गेले.












