गेल्या काही दिवसांत उसळी घेतलेल्या सोन्याच्या भावात सोमवारी झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा वाढ झाली आहे. बुलियन मार्केटनुसार, देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,०१,१४० असून २२ कॅरेटसाठी ₹९२,७१२ आहे. चांदीतही किंमतीत बदल दिसून आला असून १ किलो चांदीचा दर ₹१,१४,५३०, तर १० ग्रॅमसाठी ₹१,१४५ आहे.