मुंबईत मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका कोर्टाने फेटाळली. याचिकेत राज ठाकरे अमराठी लोकांविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचा आरोप आणि मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे सांगत सुनावणीस नकार दिला आणि याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.