उत्तराखंडमधील हरिद्वार मध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी गुन्ह्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पीडितेला छतावरून खाली फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला गंभीर अवस्थेत तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.