कल्याण-शिळ रोड वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून पुढील 20 दिवस रात्रीच्या वेळी मेट्रो गर्डर कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. या रस्त्यावरून पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट असेल. या मेट्रो कामांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.