पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी स्फोटांमुळे जलसार गावाजवळील 200 हून अधिक घरांच्या भिंतींना तडे पडल्या आहेत. सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या स्फोटांमुळे घरांचे नुकसान होत असून, खिडक्या-दरवाजे थरथरतात. ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप वाढला असून, प्रशासनाकडून नुकसानभरपाईसाठी ठोस पावले अपेक्षित आहेत.