वैद्यनाथ बँकेत पुन्हा पंकजा मुंडेंचा विजयवैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलने सर्वच जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. विजयानंतर माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह नव्या संचालक मंडळाने गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन केले. पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक पक्षभेदापलीकडे सर्वसामान्यांची असल्याचे सांगत जिल्ह्यातील विकासासाठी हा विश्वास कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.