पुण्यात पावसाळा आणि वाढते प्रदूषण यामुळे फंगल फुफ्फुस संसर्गाच्या दोन प्रकरणांची नोंद झाली असून डॉक्टरांनी आरोग्य इशारा दिला आहे. फंगल स्पोअर्स श्वासाद्वारे शरीरात गेल्यास गंभीर धोका संभवतो. दमा, कमी प्रतिकारशक्ती किंवा श्वसनविकार असलेले लोक विशेषतः धोक्यात. तज्ज्ञांनी मास्क वापरणे, प्रदूषित व बुरशीग्रस्त ठिकाणे टाळणे आणि लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.












