अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी AI समिटमध्ये मोठी घोषणा केली आहे. “अमेरिका फर्स्ट” या आपल्या योजनेअंतर्गत त्यांनी गूगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ॲमेझॉन यांसारख्या मोठ्या कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांऐवजी अमेरिकन लोकांना कामावर घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, भारतासारख्या देशांमध्ये आउटसोर्सिंगच्या नावाखाली नोकरीचे प्रमाण वाढवणाऱ्या कंपन्यांवर त्यांनी टीका केली आहे. “सर्व काही अमेरिकेसाठी” असा संदेश त्यांनी या भाषणातून दिला आहे.