गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावच्या महिला सरपंच अपर्णा राऊत यांना राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. राऊत यांनी आपल्या ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत या ग्रामपंचायतला ‘यशवंत’ ग्रामपंचायत म्हणून बहुमान मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना दिल्लीतील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.