गेल्या दोन दिवसांच्या दमदार पावसामुळे बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात तब्बल 75 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या बुलढाणा शहरासह लगतच्या चार-पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 12.40 दशलक्ष घन मीटर क्षमतेच्या या धरणात पैनगंगा नदीचे पाणी साठवले जाते. काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धरण भरताना अडचणी येत होत्या. मात्र, अलीकडच्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.












