ब्रिटनची १० वर्षीय भारतीय वंशाची बुद्धिबळपटू बोधन सिवानंदन हिने लिव्हरपूलमध्ये झालेल्या २०२५ ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर पीटर वेल्स यांना पराभूत करून इतिहास रचला. ती ग्रँडमास्टरला हरवणारी सर्वात लहान वयाची महिला खेळाडू ठरली असून तिने अमेरिकेच्या कॅरिसा यिपचा विक्रम मोडला.