आयटी कंपनी कोग्निझंटने नोव्हेंबर १, २०२५ पासून सुमारे ८०% पात्र कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली आहे. महिन्यांच्या अनिश्चिततेनंतर ही घोषणा कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकालांच्या वेळी कंपनीने दिलेल्या मार्गदर्शनानुसार, वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत बहुतेक कर्मचाऱ्यांना गुणवत्ता आधारित वेतनवाढ मिळणार असल्याचे सांगितले होते.












