विधानसभेतील रमी प्रकरणानंतर छावा प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण केल्याने हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांचे अवघ्या महिन्याभरात राष्ट्रवादी अजित पवार गट प्रदेश सरचिटणीसपदी पुनर्वसन झाले. या नियुक्तीवर विरोधक आक्रमक असताना, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी “नियुक्तीचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष अजित पवारांकडे आहेत, मला बोलण्याचे अधिकार नाहीत” म्हणत मौन साधले.