मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 मार्गांवर १२ ऑगस्ट २०२५ रोजी ३,२५,६५२ प्रवाशांनी प्रवास करून आतापर्यंतचा विक्रम प्रस्थापित केला. १८ जूनपासून केवळ एका महिन्यात ११ वेळा प्रवासी संख्येचा रेकॉर्ड मोडला गेला असून, या कालावधीत दैनिक प्रवाशांत ८.१४% वाढ झाली आहे. आरामदायी व वेळेवर सेवा मिळाल्याने मुंबईकरांचा मेट्रोकडे वाढता कल स्पष्ट दिसत आहे.