भाजप सरकारचा केला निषेध…
विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात मशाल आंदोलन आयोजित केले आहे. कथित ‘मतचोरी’ आणि निवडणूक आयोग-भाजप यांच्यातील संबंधांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने मशाल मोर्चा काढला असून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिलांची मोठ्या संख्येने या मोर्चात उपस्थिती होती.
बाईट- राजाभाऊ देशमुख, जिल्हाअध्यक्ष कॉग्रेस जालना